अभिनेत्री अनुजा साठे सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने खास आठवण शेअर केली आहे. अनुजा सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहे. पण सेटवर असणं ती खुप मिस करत आहे. एक थी बेगमच्या सेटवरील फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शुटिंगच्या मधल्या वेळात क्रु मेंबरसह चहा घेताना दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘सेटवर असणं मिस करते आहे’. अनुजा नुकतीच ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. या वेबसिरीजमध्ये तिने गॅंगस्टर सपनादीदीची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं होतं. आता हळू हळू शुटिंगला सुरुवात होत असल्याने अनुजाला लवकरच ऑनस्क्रीन पाहाण्याची संधी चाहत्यांना मिळेल यात शंका नाही.