मराठी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा नुकताच वाढदिवस झाला. अनेक मराठी सेलिब्रिटींनी सई सोबतचे हटके फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सईनेही तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास फोटो शेअर केला आहे. सईने तिच्या बर्थ डे केकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक दोन नाही तर तीन केक आहेत. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणते, वाढदिवसासाठी देवाचे आभार’.
सई आता मिमी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत सईची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राजस्थानमध्ये चित्रिकरणादरम्यान सईच्या पायाला दुखापत झाली होती. पण आता या दुखापतीमधून ती पुर्णपणे बरी झाली आहे.