By  
on  

प्रत्येक वेळी कविता शब्दरूपात भेटेल असं नाही ...... : डॉ. सलील कुलकर्णी

प्रसिध्द संगीतकार, गायक आणि सिनेदिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमाबद्दलचे , गाण्यांचे, लाईव्ह कॉन्सर्टचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात आणि चाहतेसुध्दा त्यांना भरभरुन दाद देतात. 

सलील कुलकर्णी यांनी नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. पण ती त्यांच्या आगामी प्रोजेक्टसंदर्भातील घडामोड नसून तो एक गोड थ्रोबॅक फोटो आहे. या फोटोत प्रसिध्द संगीतकार पंडीत हदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांची दोन मुलं, मुलगा शुभंकर आणि लेक दिसत असून त्यांचा हा कॅंडीड क्षण कॅमे-यात कैद झाला आहे. 

सलील कुलकर्णी म्हणताता, " प्रत्येक वेळी कविता शब्दरूपात भेटेल असं नाही ... काही क्षण...काही चित्र ...काही आठवणी ...म्हणजे कविताच असते.... Three Top Favourite people and their expressions "

 

हा गोड फोटो २०१५ सालचा असल्याचं सलील कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive