सेलिब्रिटी हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात आणि या लॉकडाऊनच्या काळात तर जास्तच ते आपला वेळ इथे घालवतात. चाहत्यांशी विविध विषयांवर ते संवाद साधतात, लाईव्ह गप्पा मारतात तसंच व्हिडीओ, फोटो, आठवणी शेअर करणं हे ओघाने आलंच. त्यानुळे चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यातलं अंतर फारच कमी झालं आहे. पण यामुळे कधीकधी अनपेक्षित अनुभवसुध्दा त्यांना इथे येतात.
आत्ता हेच बघा ना, नुकतंच प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं खुद्द त्यांनीच मेसेजद्वारे सांगितलं आहे. हे सांगताना चिंतेत असलेल्या रवी जाधव यांनी सर्वांना एक विनंतीसुध्दा केली आहे.
रवी जाधव म्हणतात, "माझं फेसबुक अकाऊंट आज हॅक झालं आहे, जर कोणाला माझ्या फेसबुकवरुन मेसेज आला तर थेट दुर्लक्ष करा." साहजिकच आहे, त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने कोणीही त्यांचा गैरवापर करु शकतो. खोटे मेसेजेस त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांना पाठवू शकतो. काही पैशांची वगैरा मागणीही करु शकतो. त्यामुळे रवी जाधव यांनी आधीच आपल्या मित्र व चाहत्यांना सावध केलं आहे.