लॉकडाऊनमध्ये संपुर्ण शिथिलता आली नाही. त्यामुळे अनेकजण घरी आहेत. अशा वेळी घरच्यांसोबत वेळ घालवण्यासोबत लाडक्या पेटससोबतही वेळ घालवला जात आहे. अभिनेत्री सई लोकूर याला अपवाद नाही. सई घरात पकडा-पकडी खेळते आहे. पण तिचा हा खेळगडी आहे तिचा पेट डॉग मोका. मोकाने काकडी खाण्याचा बेत बनवला आहे. पण त्याच्या तोंडातून काकडी काढून घेत असलेल्या सईला मात्र तो चांगलाच पळवताना दिसत आहे.
हा क्युट व्हिडियो चाहत्यांना नक्कीच आवडेल. सई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील अतिशय लोकप्रिय स्पर्धक होती. मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर या त्रिकूटाची त्यावेळी विशेष चर्चा पर्वात पाहायला मिळायची. सई मराठी सिनेमातही झळकलीय तसंच बॉलिवूडच्या किस किस को प्यार करु या हिंदी सिनेमातही तिने काम केलं आहे.