गुणी गायिका आर्या आंबेकरने या आषाढी एकादशीला चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे. या एकादशीला आर्या चाहत्यांसाठी अभंग पेश करणार आहे. आजपासून आर्याच्या युट्युब चॅनेलवर या अभंगाचा रसास्वाद घेता येणार आहे. आर्याने सोशल मिडियावर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. आजपासून तीन दिवस आर्या सकाळी 11 वाजता एक अभंग गाणार आहे. आज आर्याने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि लता मंगेशकर यांनी गायलेला ‘विश्वाचे आर्त’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग गायला आहे.
आता आर्याच्या आवाजात उद्या कोणता अभंग ऐकायला मिळेल याची उत्सुकताही चाहत्यांना असेल यात शंका नाही.