अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील एक फोटो तिने नुकताच शेअर केला आहे. या मालिकेत तिने दत्तांची आई अनुसुया हिची भूमिका साकारली होती. या फोटोसोबतच तिने चातुर्मासाचं महत्त्व सांगणारी पोस्टही लिहिली आहे. कश्मिरा या पोस्टमध्ये म्हणते, ‘चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे. ऋतुचक्राशी निगडित असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत.
आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असणारा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून मानला जातो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदी धार्मिक कार्यासाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र समजला जातो. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. काळानुरूप चातुर्मास पाळण्याचे संदर्भ बदलले असले तरी आजही प्रत्येक जण श्रद्धावान माणूस जमेल तसे चातुर्मासाचे पालन करतो. त्यामुळे बदलत्या काळातही चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे...
यावर्षी अधिक महिना आल्यामुळे पाच महिन्यांचा चातुर्मास आहे जो कमी वेळा येतो’.