‘पुढचं पाऊल’, माझ्या नव-याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. माझ्या नव-याची बायको या मालिकेतील जेनी या व्यक्तिरेखेने तिला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली. शर्मिलाने अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शर्मिलाने एटीमच्या उद्घाटनाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘एक जमाना था जब मास्क पहनके बॅंक लूटा करते थे, और अब ये जमाना है, की मास्क पहनके एटीएम का उद्घाटन कर रहे है’.
शर्मिलाच्या या सेन्स ऑफ ह्युमरचं चाहते कौतुक करत आहेत.