अभिनेत्री जेनिलिया देशमुख सध्या लातूरमध्ये आहे. या लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. पण ती जुन्या दिवसांनाही मिस करते आहे. करोनामुळे आपण एरवी करत असलेल्या मुक्त संचारावर मोठ्या प्रमाणत बंधनं आली आहेत. पण पुर्वीसारखं बाहेर पडणं, मुक्तपणे वावरणं आपण सगळेच मिस करतो आहोत. करोनाचं हे संकट लवकर दूर व्हावं आणि आपलं रुटीन पुन्हा सुरु व्हावं अशी प्रार्थना आपण सगळेच करतो आहोत.
अभिनेत्री जेनिलिया देशमुखलाही असंच वाटत आहे. जेनिलियाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समुद्रावरील वा-याला एंजॉय करतानाचा आनंद तिच्या चेह-यावर दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ते दिवस. पण हे ही दिवस निघून जातील. रितेश या फोटोच्या माध्यमातून मला सुंदर बनवल्याबद्दल थॅंक यू.’