लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण आपल्या आधीच्या रुटीनला मिस करत आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर काय करायचं याची भली मोठी बकेटलिस्ट आपण प्रत्येकानेच बनवली आहे. अनलॉकच्या टप्प्यामध्ये आता मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झालेली दिसत आहे. पण नाट्यगृह सुरु व्हायला मात्र अजून काहीसा वेळ आहे.
पण सध्या चर्चा आहे ती स्पृहा जोशीच्या पोस्टची. स्पृहाने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये हा प्रोमो व्हिडीओ असून त्यात ‘शुभारंभाचा प्रयोग’ असं लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये १२ जुलै रोजी नाट्यगृहात असंही नमूद करण्यात आलं आहे. खरं तर लॉकडाऊन वाढला असताना नाट्यगृह सुरु होणार का असा प्रश्न रसिकांना पडला. आता या प्रश्नाचं उत्तर स्पृहाच्या पुढील पोस्टमध्ये मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.