By  
on  

Video: वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ‘विठ्ठला….’ हे उर्दू गाणं भक्तांच्या भेटीला

आषाढ महिना जवळ आला की पंढरपूरला जाण्याचे वेध वारकऱ्यांना लागतात. साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही, वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. यंदा वारी चुकल्याची हुरहूर जशी वारकऱ्यांच्या मनाला लागली आहे, तशीच कलाकारांच्या मनातही आहे. विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी गायक महेश काळे, कवी- गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ‘विठ्ठला...... ' हे एक ‘युनिक’ गाणे तयार केले आहे, ज्याचे बोल उर्दू भाषेत आहेत.
 
या गाण्याच्या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून जी वारी टिपली आहे ती छायाचित्रे इथे वापरण्यात आली आहेत. तसेच संदेश भंडारे आणि योगेश पुराणिक यांनी वारीत टिपलेल्या काही छायाचित्रांचाही यात समावेश आहे. 


 
याविषयी बोलताना कवी-गीतकार वैभव जोशी म्हणाले की, कोरोना, लॉकडाऊनमुळे यंदा आषाढी वारी रद्द झाली आहे. आम्ही मित्र एकत्र येऊन गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा विठ्ठलाच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे गाणे विठ्ठलावरचे असले तरीही उर्दूमध्ये लिहिले असल्यामुळे ते आगळे-वेगळे झाले आहे. माझे बालपण मंगळवेढा येथे गेले, तेव्हा अनेक पीरबाबांना वारी मध्ये सहभागी झालेले पाहिले होते. ते वारी मध्ये जातात, विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होतात, त्यांना जर काही म्हणावेसे वाटले तर ते काय म्हणत असतील? त्यांच्या भावना उचंबळून आल्या तर ते कुठल्या पद्धतीने व्यक्त होत असतील? ते सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला असं वाटतं की जात - पात, धर्म, भाषा, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण निर्गुण निराकाराकडे पोहचले पाहिजे.


 
या गाण्याबद्दल बोलतांना प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी अमेरिकेतून आपल्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “या वर्षी वारी होऊ शकत नसल्यामुळे देवापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आम्ही या गाण्याची निर्मिती केली आहे. मी अभंग-भजन या सांप्रदायात लहानाचा मोठा झालो असल्यामुळे अभंग गातांना मला जो आनंद मिळतो तो एक विलक्षण अनुभव असतो.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive