II चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी II
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आणि खास आयोजित कार्यक्रमांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध भागातील रसिकांना मिळते, पण यंदा करोना संकटामुळे हे जरी प्रत्यक्ष अनुभवता येत नसलं तरी आपल्या लाडक्या कलावंतानी रसिकांना घरबसल्या त्यांच्या सुरेल स्वरसाजात खास नव्या भक्तीगीतांमध्ये मंत्रमुग्ध करण्याचं ठरवलं आहे.
सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना अनेक श्रवणीय गाणी आणि भक्तीगीतं देणारी महाराष्ट्राची लिटल चॅम्प विजेती आणि लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड हिने नुकतंच चंद्रभागेच्या तीरी....हे सुमधूर भजन तिच्या स्वरांत आषाढी एकादशीनिमित्त सोशल मिडीयावरुन सादर केलं आहे.
चाहत्यांनी कार्तिकीच्या या गाण्याला उदंड प्रतिसाद देत, या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव सुुरु केला आहे. सर्वचजण विठ्ठल भक्तीत लीन झाले आहेत.