आजचा दिवस Doctor’s Day म्हणून साजरा केला जात आहे. करोना विषाणूच्या या संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता महत्त्वाची जबाबदारी कोण पार पाडत असेल तर डॉक्टर्स. कित्येक तास रुग्णाच्या सेवेत राहून त्याच्या आरोग्याचं रक्षण करत असलेल्या डॉक्टरांच्या प्रती आज अनेकजण कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही यावेळी डॉक्टरांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरी म्हणते, ‘ डॉक्टर्स हेच आजच्या काळातील खरे सुपरहिरो आहेत. आपल्या आरोग्यासाठी ते जीवाची बाजी लावत असतात. सध्याच्या काळात हे सगळ्यात मोठं सत्य आहे. आज Doctor’s Day च्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानते.’ करोनाच्या काळात माधुरीही मदतीसाठी पुढे आली आहे. अलीकडेच तिने अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली होती.