आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राचं कुलदैवत समजल्या जाणा-या विठ्ठलाच्या भक्तीत रमण्याचा दिवस. सेलिब्रिटीही आज आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री वीणा जगतापनेही चाहत्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच वीणाने एकादशी का साजरी करावी याची पोस्ट शेअर केली आहे. ‘या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे ते समजून घ्यायला हवे. या एकादशीला `देवशयनी एकादशी’ म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.