‘लागीरं झालं जी’ या मालिकेची ओळख असलेला एक कलाकार नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. ‘लागीरं’ चे पटकथा लेखक तेजपाल वाघ लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अभिनेता निखिल चव्हाण यांनी ही पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.या पोस्टला कॅप्शन देताना झालं बाबा एकदाचा.... अभिनंदन वाघोबा.. ते न्हव ..आता पुढचा नंबर कोणाचा असेल..? तुम्हाला काय वाटतं..?’ तेजपाल यांनी लागीरंची पटकथा लिहिली होती.
अभिनयात रस असलेला तेजपाल यांना या मालिकेच्या निमित्ताने लेखक म्हणूनही प्रसिद्धी मिळाली. याशिवाय रिंकू राजपालची भूमिका असलेल्या ‘मेक अप’ सिनेमातही तेजपाल यांनी भूमिका साकारली होती.