वेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारीत असलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीच्या ‘परतु’ या मराठी सिनेमाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमांत आपली मोहोर उमटवली. या सिनेमाच्या निर्मार्त्यांपैकी निर्माते रुपेश महाजन यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. पण त्याबाबत अधिक माहिती अद्याप उलगडू शकलेली नाही.
न्यूयॉर्क आणि भारत अशा दोन देशांच्या धर्तीवर या सिनेमाची कथा घडते.दोन देशातल्या कलाकार तंत्रज्ञांचा संगम ‘परतु' सिनेमातून पाहायला मिळाला. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा नामांकित कलाकारांच्या अभिनयाने ‘परतु' सजला आहे.