ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, गंगुबाई नॉन मॅट्रीक या मालिकांमधून ते घराघरात पोहचले होते. इतकंच नाही तर हसवाफसवी, वस्त्रहरण यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांचं मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं.
लीलाधर कांबळी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्वच स्तरातून त्यांना श्रध्दांजली वाहिली जातेय. अभिनेता सुबोध भावे यानेसुध्दा ट्विट करत श्रध्दांजली वाहिली आहे.
सहज-सुंदर अभिनयाने आपली ओळख जपणारे जेष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे निधन.
काका तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या भूमिका आणि आणि तुम्ही नेहमीच स्मरणात रहाल. pic.twitter.com/4SX7osxRMa— Subodh Bhave (@subodhbhave) July 2, 2020
प्रेमा तुझा रंग कसा या वसंत कानेटकर लिखित नाटकातून लीलाधर कांबळी यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती.