प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. सरोज यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अनेक आठवणी सोशल मिडियावर शेअर केल्या जात आहेत. अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये ते आणि सरोज खान थिरकताना दिसत आहे. सचिन यांच्या हिंदी सिनेमातील दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘प्रेम दिवाने’ सिनेमात हे दोघंही नृत्य करताना दिसत आहेत.
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर सहभागी असलेल्या ‘नच बलिये’ च्या सीझनमध्येही सरोज यांनी परिक्षकाचं काम केलं आहे. पुढे ते म्हणतात, ‘सरोजजी तुमचं सिनेसृष्टीतील योगदान अमुल्य आहे.