अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सरोज खान यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनीही सरोज खान यांची आठवण शेअर केली आहे. ‘छोडो कल की बाते’ या सिनेमाच्या सेटवरील फोटो सलील यांनी शेअर केला आहे. या सिनेमातील सलील कुलकर्णी यांच्या गाण्याला सरोज यांनी कोरिओग्राफ केलं होतं.
याबाबत बोलताना सलील म्हणतात, त्यांनी माझ्या गाण्याला कोरिओग्राफ करावं ही माझ्यासाठी आनंददायी बाब होती. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं सरोज खान यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.