सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झालं. सरोज यांनी 2000 हजारहून अधिक गाण्यांना नृत्य कौशल्याने सजवलं आहे. दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांच्या ‘मराठी तारका’ या प्रसिध्द कार्यक्रमासाठी सरोज खान यांनी काही डान्सचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं.
शिवाय त्या अनेकदा डान्स रिहर्सलसाठीही उपस्थित असायच्या. अभिनेत्री स्मिता शेवाळेनेही त्यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी सरोजजी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून महेश यांचे आभारही मानले आहेत. यासोबतच स्मिताने एक रिहर्सल व्हिडियोही शेअर केला आहे.