By  
on  

तेजश्री प्रधानच्या या हिंदी सिनेमातील गाण्याची कोरिओग्राफी केली होती सरोज खान यांनी

गेली चार दशकं बॉलिवूड्ला आपल्या तालावर नाचवणा-या सरोज खान आज अनंतात विलीन झाल्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. सरोज यांनी तेजश्री प्रधानचा पहिला हिंदी सिनेमा बबलू बॅचलर या सिनेमाचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. बबलू बॅचलरचे दिग्दर्शक अग्निदेव चटर्जी यांची ट्वीटर पोस्ट शेअर करत तेजश्रीने सरोज खान यांना श्रद्धाजली वाहिली आहे. तेजश्री प्रधान ‘बबलू बॅचलर’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत शर्मन जोशी झळकणार आहे. हा सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे तो पुढे गेला आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive