प्रार्थना बेहरे सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती स्वत:चे आणि पतीचे फोटोही अपलोड करत असते. पण नुकताच तिने एका खास कारणासाठी फोटो अपलोड केला आहे. प्रार्थनाने तिचा आणि पती अभिषेक जावकरचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना प्रार्थना म्हणते, ‘2 july 2017 ला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि...... पुढचं तर तुम्हाला माहिती आहेच.. लव्ह मॅरेजला पसंती न देता प्रार्थनाने पारंपरिक पद्धतीने अरेंज मॅरेज केलं होतं.
ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे. गोव्यामध्ये प्रार्थनाच्या डेस्टिनेशन वेडिंगला अनेक मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती.