‘सा रे ग म प’ लिटील चॅम्प्समध्ये विजेती ठरलेली कार्तिकी गायकवाड आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. कार्तिकीचं लग्न ठरलं आहे. पुणेस्थित असलेल्या इंजिनिअर रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकी विवाहबद्द्ध होणार आहे. खुद्द कार्तिकीने ही माहिती दिली आहे. अलीकडेच कार्तिकीचा कांदेपोहेचा कार्यक्रम पार पडला. येत्या 26 जुलैला कार्तिकीचा साखरपुडा पार पडणार आहे. लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. कार्तिकीने गायनासोबतच सुत्रसंचालनाचं कामही करते. या बातमीमुळे कार्तिकी आणि रोनितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.