आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान गुरुला आहे. नवी वाट दाखवणा-या गुरुचं स्थान सर्वात वर आहे. आई-वडिल आपल्या जगण्याला अर्थ देतात तर गुरु जगण्याचं प्रयोजन सांगतात. अभिनेता सुबोध भावेनेही त्याच्या आयुष्यातील गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीना आजच्या दिवशी नमन केलं आहे. सुबोधने उस्ताद आमीर खान साहेब आणि पंडित जितेंद्र अभिषेकी या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये सुबोध म्हणतो, ‘उस्ताद अमीर खान साहेब आणि पंडित जितेंद्र अभिषेकी या दोन्ही गुरूंना साष्टांग नमस्कार’. सुबोध या लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत होता.