तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता शरद केळकर सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतो. शरद आता आगामी कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहेच. सुपरफिट असलेला शरद अनेकदा वर्क आऊटचे व्हिडियो शेअर करत असतो. आताही त्याने खास व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तो एका पंचिंग बॅगवर प्रॅक्टीस करत आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ कदाचित ही पंचिंग बॅग नसून करोना व्हायरस असता तर चांगले ठोसे लगावता आले असते.’ नेटिझन्सनीही यावर कमेंट करत योग्य विचार असल्याचं सांगितलं आहे. शरद आता अॅमेझॉन प्राईमची वेबसिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या दुस-या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनमधील त्याची अरविंद ही व्यक्तिरेखा रसिकांना आवडली होती.