आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान गुरुला आहे. नवी वाट दाखवणा-या गुरुचं स्थान सर्वात वर आहे. आजच्या दिवशी गुरुने दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. अभिनेता संतोष जुवेकरनेही त्याला गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. ही व्यक्ती आहे अभिनेता मनोज वाजपेयी.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संतोष म्हणतो, ‘ माझे उत्तम मित्र, आवडते अभिनेते आणि गुरु मनोज वाजपेयी सरांना गुरुपौर्णिमेनिमित्त मनापासून अभिवादन. तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या’. संतोष सध्या ‘भोसले’ या सोनी लिव्ह वरील सिनेमात दिसत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.