बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. रणवीरला हटके अंदाजात शुभेच्छाही दिल्या जात आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ फेम कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेही रणवीरला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीरने सिंबाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सादर केलेल्य अॅक्टमध्ये श्रेयाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यावेळी रणवीरने तिचं कौतुक केलं होतं.
ही आठवण पोस्ट करत श्रेयाने रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया या पोस्टमध्ये म्हणते, ‘ तु खुपच भन्नाट आहेस. मी खुपच सुदैवी आहे. या सगळ्या अविस्मरणीय क्षणांसाठी तुझे खुप आभार’.