लोभस चेहरा असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेचं नाव सर्वप्रथम आहे. वयाच्या १९ व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केलेल्या सोनालीने आजवर अनेक यशस्वी सिनेमांमध्ये झळकली आहे. सोनाली तिच्या अनेक आठवणी चाहत्यांशी शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने नऊवारीसाडीतील एक फोटो शेअर केला होता. सोनाली मराठी असली तरी तिला पडद्यावर मराठमोळ्या अंदाजात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली नव्हती.
पण या फोटोच्या माध्यमातून ती पुर्ण झाली. यात सोनालीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा, पारंपरिक मराठमोळे दागिने असा पेहराव केला आहे. चाहत्यांनीही सोनालीच्या या लूकवर कौतुक करणा-या कमेंट्स केल्या आहेत. सोनालीने काही दिवसांपुर्वीच हायग्रेड कॅन्सरशी लढा दिला आहे.