मराठी सिनेमातील काही दिग्गज दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव अग्रक्रमाने आहे. ‘सैराट’ सिनेमाने २०१६ मध्ये शंभर कोटीच्या घरात जाऊन पोहोचला होता. सैराटने नागराजला मोठ्याप्रमाणावर ओळख मिळवून दिली. यशोशिखरावर असलेल्या नागराज यांची वैयक्तिक आयुष्यातील कथा मात्र वेगळी आहे. नागराज यांची पत्नी सुनीता सध्या धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करत आहे.
१७ मे १९९७ साली नागराज आणि सुनीता यांचं लग्न झालं. पण सतत होत असलेल्या वाद-विवादामुळे 2014 मध्ये ते विभक्त झाले. नागराज यांनी सुनीता यांना पोटगी म्हणून काही पैसे दिले होते. पण त्यात त्यांचा निर्वाह अशक्य आहे. यासाठी त्या धुणी- भांडी करून उदरनिर्वाह करत आहेत.