हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरचा छंद मात्र काहीसा हटके आहे. एरवी स्टायलिश दिसणारी स्मिता बाईक रायडर आहे. स्मिताला खुप आधीपासूनच बाईकिंगची आवड आहे. स्मिताने आजवर अनेक रेसिंग स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. स्मिता तिच्याभावासोबत अनेकदा बाईक रायडिंग करताना दिसते. आताही तिने एक व्हिडियो शेअर केला आहे.
यामध्ये स्मिता उंचवटे असलेल्या रस्त्यांवरून सफाईदारपणे बाईक चालवताना दिसते आहे. हिमालयमध्ये राईडिंग करणं हे स्वप्न असल्याचंही यावेळी स्मिताने सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वीच स्मिताने तिचा मुंबई ते कोंडानपुरचा बाईक रायडिंगचा व्हिडियो चाहत्यांशी शेअर केला आहे. पाऊस, वारा, धुकं ही आव्हानं पार करत केलेला हा सफर रोमांचकारी आहे.