या लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी सोशल मिडियावर अॅक्टीव्ह आहेत. यावेळी नवनवीन कल्पना शक्तीला वाव देत भन्नाट आयडियाज शेअर करत आहेत. आपल्या विनोदी कल्पनाशक्तीमुळे या लॉकडाऊन काळात नेहमीच चर्चेत राहणा-या अभिनेता -दिग्दर्शक प्रसाद ओकने आताही एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये प्रसादने एक पोस्टर शेअर केलं आहे यात तो म्हणतो, ‘ बायकोचा राग आला तर तो गिळा, नाहीतर ‘गिळायला’ मिळणार नाही. अर्थात प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भन्नाट कमेंटस केल्या आहेत.