गेले काही महिने मालिकांचे जुने एपिसोड पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांच्या भेटीला आता नवे एपिसोड लवकरच येणार आहेत. 13 जुलैपासून झी मराठीवर पुन्हा मालिकांचे नवे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माझ्या नव-याची बायको मालिकेत आता एक नवीन बदल होणार आहे. मालिकेत पुन्हा आधीची शनाया म्हणजेक रसिका सुनील परत आली आहे. शनाया नं. 2 ईशा केसकर प्रकृती अस्वास्थामुळे हा शो सोडत आहे.
तिची जागा पुन्हा आधीची शनाया म्हणजेच रसिका सुनील घेताना दिसणार आहे. रसिकाने यादरम्यान एक फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने चेह-यावर माझ्या नव-याची बायको असं प्रिंट असलेला मास्क लावला आहे. 13 जुलैपासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांना नवे एपिसोड्स पाहता येणार आहेत.