By  
on  

प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादीचं  ‘What’s up लग्न’ ओटीटी प्लॅटफॉर्मवसुध्दा ठरतंय हिट

सोशल मिडीयाच्या जगात रममाण असलेल्या आजच्या तरुण जोडप्यांना अतिशय मार्मिक संदेश देण्यात यशस्वी ठरलेला  ‘What’s up लग्न’ हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वरही हिट ठरतोय. अल्पावधीतच जगभरातून ६ लाखाहून अधिक व्ह्यूज या चित्रपटाने मिळवले आहेत. आजच्या तरुणाईची मानसिकता, लग्न संस्काराविषयीचे मत, त्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न ‘What’s up लग्न’ चित्रपटातून केला असून, प्रेक्षकांना तो खूपच भावत आहे. ‘अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी,  विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. ‘फिनक्राफ्ट मीडिया अँड ‘एन्टरटेन्मेंट’ या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे असून प्रस्तुती ‘व्हिडीओ पॅलेस’ यांची आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive