By  
on  

केतकी चितळेला नेत्याने दिली धमकी " पुन्हा जर...... ", शेअर केला स्क्रीनशॉट

दोन-तीन दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे सोशल मिडीयावर बराच भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय.  अजूनही ती वादाची ठिणगी शमलेली नाही. आणि वाद ओढवून घ्यायची तर ही केतकीची पहिलीच वेळ नाही. अनेकदा ती नेटक-यांच्या रोषाला सामोरी जात आली आहे. स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावर तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र त्यानंतर केतकी चितळे हिने या तरुणांवर आक्रमक टीका केली. त्यामुळे केतकीलाही ट्रोल केलं जात आहे.

अशातच केतकी चितळेनी आणखी एक पोस्ट लिहिली असून त्यातून शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.यासोबतच तिने त्यांच्या मेसेजचा पुरावादाखल एक स्क्रीनशॉटसुध्दा शेअर केला आहे. 

यापूर्वी निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिचा मेंदू गुडघ्यात असल्याचं म्हणत तिचा खरपूस समाचार घेतला होता. हा स्क्रीनशॉट शेअर करुनही केतकीला अनेकांनी कॉमेंट्स करुन ट्रोल करणं सुरुच ठेवलं आहे. 

 

 

नीट राहायचे कळलं का महाराष्ट्रात राहते....अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळत नसेल तर असले फालतु लिखाण करावे लागते.... सध्या.काम नसल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं, अशा  नानाविविध प्रकारच्या कॉमेंट्समधून नेटिझन्सनी केतकीचा खरपूस समाचार घेतला आहे. 

 

वाचा केतकीची फेसबुक पोस्ट

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive