By  
on  

शुभारंभाच्या दिवशीच ‘नेटक’च्या पदरात पडलं हे यश, वाचा सविस्तर

“शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात १२ जुलै रोजी” अशी टॅगलाईन वापरत ‘नेटक’ या नव्या माध्यमाने उत्सुकता वाढवली होती. नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग झाला. मराठी नाट्यसृष्टीत असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. 

 

 

मुंबईमध्ये 12  तारखेला याचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला आणि पहिल्याच दिवशी हा प्रयोग हाऊसफुल झाला. अभिनेता, दिग्दर्शक ऋषीकेश जोशीने एक व्हिडियो शेअर करत ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच त्याने मराठी नाट्यरसिकांचे आभार मानले आहेत. तेजस रानडे यांनी  हे नाटक लिहिलं आहे. या नेटकमध्ये स्पृहा जोशी, वंदना गुप्ते आणि भार्गवी चिरमुले यांच्या भूमिका आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive