By  
on  

स्मिता गोंदकरने तिच्या या मित्राला खास अंदाजात केलं बर्थ डे विश

बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोगचा आज वाढदिवस आहे. पुष्करवर त्याचे फॅन्स, मित्र मंडळी, पत्नी जास्मिन यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या एका मैत्रिणीनेही खास मेसेज शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री स्मिता गोंदकरने पुष्करसोबतचा फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये स्मिता म्हणते, ‘हॅपी बर्थ डे पुष्कर.

 

 

आपली मैत्री दशकाहून जुनी आहे. नात्यातील अनेक चढ उतारांनी आपली मैत्री घट्ट केली आहे. तुझ्या एका हाकेसरशी मी येऊ शकते. या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.’  बिग बॉसमध्ये असतानाही या जोडीच्या फ्रेंडली बाँडिंगचं चाहत्यांनी कौतुक केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive