By  
on  

म्हणून शर्मिला शिंदेला बसवलं सेटच्या बाहेर

लॉकडाऊनमधून अनलॉकमध्ये आपण प्रवेश केला आहे. त्यासोबतच मालिकेच्या शुटिंगलाही पुन्हा सुरुवात झाली आहे. मालिकेच्या नव्या एपिसोड्ससोबत काही नवीन ट्वीस्ट देखील येताना दिसत आहेत. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यात शनायाची भूमिका रसिका सुनील साकारताना दिसत आहे. या मालिकेच्या शुटिंगचं लोकेशनही बदललं आहे. 

 

 

एका रिसॉर्टमध्ये या मालिकेचं शुटिंग सुरु आहे. या दरम्यान जेनीची व्यक्तिरेखा साकारणा-या शर्मिला शिंदे हिला मात्र सेटच्या बाहेर बसावं लागलं. तिच्या बोटाचं स्कॅन ऑक्सिमिटरवर होत नसल्याने तिला सेटवर एंट्री दिली नाही. शर्मिलाने हा सेटबाहेर बसलेला फोटो शेअर केला आहे. गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकरने हा फोटो काढला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive