By  
on  

आसावरी आणि अभिजीत यांच्यासोबत असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

मराठी सिनेमात झळकलेले अनेक कलाकार काळाच्या ओघात मागे पडत जातात. अशा कलाकारांमध्ये आहेत शुभांगी रावते. 1983 मधील ’ गुपचूप गुपचूप’ या सिनेमात शुभांगी दिसल्या होत्या. अशोक सराफ, श्रीराम लागू, रंजना, महेश कोठारे, कुलदीप पवार, शुभांगी रावते , पद्मा चव्हाण अशी तगडी कास्ट या सिनेमात होती. 

या सिनेमात शुभांगी रावते यांनी  रंजनाची बहीण ‘श्यामा’ची भूमिका साकारली होती. याशिवाय मामला पोरींचा या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. निवेदिता सराफ यांची आणि शुभांगी यांची मैत्रीही झाली. लग्नानंतर मात्र त्या संसारात रमल्या. पण आता शुभांगी यांनी सेकंड इनिंग सुरु केली तर चाहत्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive