By  
on  

अभिनेता शरद केळकर म्हणतो, ‘रोगन जोश बनवून आता माझ्यात जोश उरला नाही’

लॉकडाऊन संपुन आता अनलॉकला सुरुवात झाली असली तरी म्हणावे तसे व्यवहार सुरु झाले नाहीत. त्यामुळे अजूनही बहुतेक सेलिब्रिटी घरातच आहेत. घरातूनच ते सोशल मिडियावर चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अभिनेता शरद केळकरही सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह आहे. शरदने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये त्याने रोगन जोश बनवला आहे. यासोबतच शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये शरद म्हणतो, ‘सगळ्या महिलांना सलाम. अडीच तास स्वयंपाकघरात घालवल्यावर बनलं हे रोगन जोश. अर्थात या नंतर काहीच जोश उरला नाही. शरदच्या या कलेचं चाहते मात्र कौतुक करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive