By  
on  

अभिजीत खांडकेकरसाठी आजची तारीख आहे खास, जाणून घ्या

‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील गुरुनाथसाठी आजची तारीख खास आहे. लग्नाचा वाढदिवस किंवा त्याचा वाढदिवस म्हणून नाही तर आजच्या दिवशी त्याला दोन उत्तम व्यक्तिरेखा सापडल्या. अभिजीतच्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेला आज 10 वर्षं पुर्ण झाली तर ‘माझ्या नव-याची बायकोचं शुटिंगही आजच्या दिवशी सुरु झालं होतं. 

 

माझिया प्रियाला प्रीत कळेना ला १० वर्ष झाली.. ️ zee marathi Harshada Khanvilkar Mrunal Dusanais Prasad Jawade Sankarshan Karhade

Posted by Abhijeet Khandkekar on Sunday, 19 July 2020

 

माझिया.... मधील अभिजीत आणि शमिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या लव्हस्टोरीचे अनेक फॅन्स आहेत. तर माझ्या नव-याची बायकोमधील गुरुनाथच्या नावाने अनेकजण बोटं मोडतात. या दोन्ही व्यक्तिरेखांनी अभिजीतला खास ओळख दिली. ‘माझिया’मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल दुसानिस झळकली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive