By  
on  

शरद पोंक्षे यांनी घरातील खास व्यक्तीला दिल्या 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता शरद पोंक्षे सोशल मिडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असतात. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर अलीकडेच ते अग्निहोत्र 2 मध्ये दिसले होते. आता त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शरद यांच्या आजीचा 100 वा वाढदिवस आहे. या निमित्त लहानपणीची एक आठवण त्यांनी पोस्ट केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

१९७० मी लहान असताना आई वडील दोघेही नोकरी करायचे म्हणून आईचे वडील, दादा आजोबा म्हणाले की ऊशा म्हणजे आई की शरदला मिरजेला ठेव आणि निर्धास्तपणे नोकरी करा. मग मला मिरजेला आजोळी ठेवण्यात आल. माणसांनी भरलेल घर, मावश्या चूलतमामाम दोन आज्या अश्या मधे मी रहायला गेलो. तिथ मला माझ्या आजीजवळ रहाण्याचा योग आला. सख्ख्या आईपासून पोरग लांब आहे ह्याची कायम जाणिव ठेऊन माझे सगळे लाड आजी आजोबांनी केले. त्या काळात आजीच माझी आई होती. मावश्या पेक्षाही जास्त लाड माझे व्हायचे.खुप चांगले संस्कार झाले त्याच वयात.माझ्या व्यक्तीमत्वाचा पाया तिथेच तयार झाला. हे आज सगळ सांगायच कारण ती माझी आजी, माझी माय आज १०० वर्षाची झाली. हल्ली १०० वर्षांची माणस पहायला मिळत नाहीत. तीचा आज वाढदिवस. आजी तूला खुप शुभेच्छा.

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe) on

 

यामध्ये ते म्हणतात, ‘१९७० मी लहान असताना आई वडील दोघेही नोकरी करायचे म्हणून आईचे वडील, दादा आजोबा म्हणाले की ऊशा म्हणजे आई की शरदला मिरजेला ठेव आणि निर्धास्तपणे नोकरी करा. मग मला मिरजेला आजोळी ठेवण्यात आल. माणसांनी भरलेल घर, मावश्या चूलतमामाम दोन आज्या अश्या मधे मी रहायला गेलो. तिथ मला माझ्या आजीजवळ रहाण्याचा योग आला.

 सख्ख्या आईपासून पोरग लांब आहे ह्याची कायम जाणिव ठेऊन माझे सगळे लाड आजी आजोबांनी केले. त्या काळात आजीच माझी आई होती. मावश्या पेक्षाही जास्त लाड माझे व्हायचे.खुप चांगले संस्कार झाले त्याच वयात.माझ्या व्यक्तीमत्वाचा पाया तिथेच तयार झाला. हे आज सगळ सांगायच कारण ती माझी आजी, माझी माय आज १०० वर्षाची झाली. हल्ली १०० वर्षांची माणस पहायला मिळत नाहीत. तीचा आज वाढदिवस. आजी तूला खुप शुभेच्छा.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive