By  
on  

प्रियांका बर्वे चाहत्यांसाठी पुन्हा घेऊन आली आहे ‘रारारमपम’

डबलसीट, रमा माधव, मुंबई पुणे मुंबई 2, पानिपत या सिनेमातील गीतांना सुरेल आवाजाने सजवलेली गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. यावेळी मात्र तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रशांत दामले, राहुल रानडे, गुरु ठाकूर, वैभव जोशी आणि प्रियांका बर्वे हे कलाकार ‘रारारमपम’ या ऑनलाईन शोसाठी एकत्र आले होते.

 

 

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी असलेल्या या शोला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा हा शो चाहत्यांसाठी सादर केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास काही काळ बंदी होती अशा वेळी ऑनलाईन माध्यमाच्या सहायाने भेट साधली जायची. पण बदलत्या काळासोबत जात आता मैफिलीही ऑनलाईन होताना दिसत आहेत. त्यामुळे ‘रारारमपम’ ऑनलाईन माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive