By  
on  

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील या कलाकाराचे झाले निधन

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत माने काकांची भूमिका साकारणारे जेष्ठ कलाकार 'विजय वीर' यांचे दुःखद निधन झालं. रुग्णालयात त्यांचे ह्र्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे समजतं. रंग माझा वेगळा या मालिकेत माने काका या पोलिस हवालदाराची भूमिका साकारली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा या मालिकेत 'माने काकांची' भूमिका करणारे जेष्ठ कलाकार 'विजय वीर' यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना... त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.. स्टार प्रवाहाच्या संपूर्ण परिवारातर्फे विजय वीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! #RangMajhaVegla #StarPravah

A post shared by Star Pravah (@star_pravah) on

 

विजय वीर यांनी रंग माझा वेगळासोबतच माझ्या नव-याची बायको या मालिकेतही काम केलं होतं. माझ्या नव-याची बायको या मालिकेत त्यांनी राधिकाच्या सोसायटीच्या वॉचमनची भूमिका साकारली होती. स्टारप्रवाह ने त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive