By  
on  

लॉकडाऊनमुळे या मराठी अभिनेत्यावर आली उपासमारीची वेळ, केस कापून करतोय उदरनिर्वाह

जगभर करोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. करोना संकटासोबतच जगभर बेकारीची लाट उसळलीय. एकीकडे आरोग्याशी झुंद देताना आपण बोरोजगारीलाही तोंड देतोय. पोटाला अन्न नाही तर डोक्यावर छत्र नाही अशी अनेकांची अवस्था झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यात मालिका, वेबसिरीज आणि सिनेमांचं चित्रिकरणही ठप्प होतं. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. 

अशातच मराठी अभिनेता तुषार शिंगाडे आपल्या गावी मालवण येथे मुंबईतून परतला. करोना व लॉकडाऊन या अस्मानी संकटात गावी परतण्याशिवाय त्याच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता, कारण हाताला काम नाही तर तो खाणार काय.....त्यामुळे आता न्हावी म्हणून गावी तो आपला उदरनिर्वाह करतोय. 

तुषार हा अनेक सिनेमे, मालिका व नाटकांत छोट्या-मोठ्या भूमिका करतो. त्याची यूट्यूबवर नुस्ताफिल्मी या चॅनेलवर ब्रो नावाची एक वेबसिरीजही सुरु होती. आता गावी येऊन तो आपल्या वृध्द आई-वडीलांना शेतीच्या कामातही मदत करतोय. तर केस कापण्याचे त्याला पन्नास रुपये मिळतात. 

लॉकडाऊन संपल्यानंतर तुषार पुन्हा मुंबईला येऊन आपल्या अभिनयाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive