By  
on  

लाठी-काठी चालवणा-या या आजींचा व्हिडियो पाहिलात का? रितेश देशमुखही झाला प्रभावित

सध्या सोशल मिडियावर लाठी-काठी चालवणा-या आजींचा व्हिडियो व्हायरल होताना दिसतो आहे. पुण्यातील हडपसरमधील हा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या आजींचं लाठीकाठीमधील कौशल्य पाहून अभिनेता रितेश देशमुखही प्रभावित झाला आहे. रितेशने हा फोटो पोस्ट करत वॉरिअर आजी असं कॅप्शन दिलं आहे. 

 

 

यासोबतच रितेशने या आजींचा संपर्क कुणाशी असेल तर कळवावं असं आवाहनही केलं होतं. त्यानुसार आजींचा रितेशशी संपर्क झाल्याचंही सोशल मिडियावर कळवलं आहे. हा व्हिडियो पोस्ट करताच चाहत्यांनी या आजींना मदत करण्याची विनंती केली होती.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive