By  
on  

हा फोटो पाहिला आणि निवेदिता सराफ यांच्या आठवणी दाटून आल्या

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री म्हणजे. निवेदिता अशोक सराफ. मराठी सिनेमांतील ८०-९० चा काळ त्यांनी अशोक सराफ यांच्या जोडीने गाजवला. काळासोबतच चालणा-या निवेदिता या सोशल मिडीयावर बराच सक्रीय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. अभिनयाशिवाय त्यांना स्टाईलिंग आणि विविध प्रकारचा स्वयंपाक करण्याची खास आवड आहे. 

नुकतंच निवेदिता यांनी एका पोस्टमधून आपल्या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या म्हणतात....टिळक आणि आगरकर...विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक....साहित्य संघाची निर्मिती साल १९८३ माझ्या आयुष्यातला एक अप्रतिम अनुभव....प्रमोद पवार टिळक श्याम पोंक्षे आगरकर सुषमा सावरकर सौ टिळक मी सौ आगरकर अतुल परचुरे नाना आगरकर आणि भक्ति बर्वे काकू....हा फोटो पाहिला आणि एकदम आठवणी दाटून आल्या

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक साहित्य संघाची निर्मिती साल १९८३ माझ्या आयुष्यातला एक अप्रतिम अनुभव ह्या फोटोत आहेत प्रमोद पवार टिळक श्याम पोंक्षे आगरकर सुषमा सावरकर सौ टिळक मी सौ आगरकर अतुल परचुरे नाना आगरकर आणि भक्ति बर्वे काकू हा फोटो पाहिला आणि एकदम आठवणी दाटून आल्या

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

 

अनेकदा निवेदिता या आपल्या अभिनय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळतायत. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्, आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive