By  
on  

आधी राजकारण्यांनी राजीनामे द्यावेत आणि मग ज्येष्ठ कलाकारांवर बंधनं घालावीत: विक्रम गोखले

कोरोनाच्या संकटाच्या  पार्श्वभूमीवर मालिकांच्या शूटींगच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाकारण्यात येत असल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनीसुध्दा आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.तसंच या पूर्वीसुध्दा याबाबत संपूर्ण मनोरंजन विश्वातून नाराजीचा सूर उमटला होता..  

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली, पण त्यामध्ये शुटिंगच्या सेटवर ६० वर्षांवरील अधिक वयाचे कलाकार असू नये,अशी बंधने कायम ठेवण्यात आली. अनेक मालिकांमध्ये ज्येष्ठ कलाका महत्त्वपूर्ण भूमिका बजावतायत.  त्यामुळे मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि निर्मात्यांना या नियमाची  चांगलीच अडचण जाणवू लागली.

त्यामुळे आता राज्य सरकार या निर्णयावर कोणती पावलं उचलंतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive