By  
on  

वॉरिअर आजींचा व्हायरल व्हिडियो पाहून यासाठी आला केदार शिंदेंना संताप

पुण्यातील हडपसर इथे राहणा-या शांताबाई पवार या आजीबाईंना लाठी-काठी चालवतानाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडियोमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आजींना मदतही पोहोचवली गेली आहे. 
सोनू सुद, रितेश देशमुख यांनीही आजीच्या या कौशल्याचं कौतुक केलं आहे. पण केदार शिंदे यांना मात्र यातील एक बाब खटकली आहे.

 

 

त्यांनी आजींचा व्हिडियो पोस्ट करत सणसणीत कॅप्शन दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘ ‪त्या आजींचा video गाजतोय. चहूबाजूने मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे video काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणं. किती संयुक्तीक आहे? लाज वाटायला हवी आपल्याला!#आजी #शांताबाई_पंवार ‬’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive