By  
on  

५ महिन्यांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच सुबोध भावेने केली 'ही' गोष्ट

करोना संकटामुळे जवळपास तीन-चार महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, कोणालाही घराबाहेर अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडण्यास मनाई होती. घरी कुटुंबासोबत वेळ घालवून छंद जोपासूनसुध्दा रुटीनची आठवण तर येणारच. पण आता अनलॉकमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची परवानगी दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. 

घरातून सेटवर पुन्हा कधी परतायला मिळणार याचा विचार करणारे सेलिब्रिटी आता हळूहळू बॅक टू वर्क होत आहेत. आघाडीचा अभिनेता सुबोध भावेनेसुध्दा नुकतंच कामाचा श्रीगणेशा केला आहे. सोशल मिडीयावरुन सुबोधनेच  पुन्हा एकदा नव्याने काम सुरु करण्याचा आनंद शेअर केला आहे. तो म्हणतो, "५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पहिल्यांदा एका जाहिरातीच चित्रीकरण केलं. (जाहिरात काही दिवसात येईलच) अर्थात सर्व प्रकारची काळजी घेऊन, मोरया"

 

ब-याच कालावधीनंत लाडका अभिनेता सुबोध भावेच्या या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तेव्हा सर्वचजण या जाहिातीची आतुरतेने वाट पाहतील यात शंका नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive