मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्या आईचं निधन झालं आहे. वृद्धपकाळामुळे वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २८ जुलै रोजी त्यांची झोपेतच प्राणज्योत मालवल्याचं बोललं जात आहे.
ललिता केंकरे असं विजय केंकरे यांच्या आईचं नाव असून त्या दिग्गज अभिनेत्रीदेखील होत्या. अनेक नाटकं आणि सिनेमांध्ये काम करुन आपली ओळख निर्माण केली होती.विजय केंकरे यांची आई असण्यासोबतच त्या प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी होत्या.